
बँकेचे नियम बदलले; आता 'या' व्यवहारांसाठी पॅन-आधार असेल अनिवार्य
Banking deposit transaction rules : सरकारने चालू खाती उघडण्यासाठी तसेच एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी किंवा काढण्यासाठी आधार किंवा पॅन नंबर (PAN) अनिवार्य केले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की एका आर्थिक वर्षात बँकांशी मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅन नंबर किंवा आधारचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य असेल असे सांगण्यात आले आहे.
तसेच या निर्णयासोबतच हे कागदपत्रे कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी देखील आवश्यक असेल. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल, कारण बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांची माहिती देणे अनिवार्य होणार आहे.
हेही वाचा: टाटाची Nexon EV Max लाँच, एका चार्जवर चालते 437 किमी; पाहा किंमत-फीचर्स
या व्यवहारांमध्ये पॅन-आधार आवश्यक
बँकिंग कंपनी किंवा कॉर्पोरेटिव्ह बँक किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये एक किंवा अधिक खात्यांमध्ये एका आर्थिक वर्षात 20 लाख रोख जमा करतेवेळी.
एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील कोणत्याही एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रोख रक्कम काढली जाते तेव्हा.
बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडल्यावर.
नियम काय आहे?
नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पॅन माहिती देणे आवश्यक असेल परंतु त्याच्याकडे पॅन नसेल तर तो आधार बायोमेट्रिक ओळख देऊ शकतो.
हेही वाचा: नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल
Web Title: Pan Aadhaar Now Mandatory For Cash Deposits Withdrawals Above This Amount In Banks Post Office
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..