नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar slams navneet rana over challenge to cm uddhav Thackeray

नवनीत राणांच्या लिलावती रुग्णालयातील फोटो प्रकरणी गुन्हा दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची हनुमान चालिसा वाद प्रकरणी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना एमआरआय रुममध्ये नेले असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

नवनीत राणा यांचे एमआरआय दरम्यानचे फोटो काढल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी हा गुन्हा आज्ञात व्यक्तिविरोधात नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी निवेदन दिलं होतं. एमआरआय मशिनजवळ कॅमरा घेऊन जाऊ शकत नाही, तरी फोटो कसे काढण्यात आले यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तिविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: Google ची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी; तुम्हाला अडचण येईल? जाणून घ्या

एमआरआय मशिनजवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाता येत नाहीत, असा नियम आहे. तरी देेखील नवनीत राणा याचे फोटो काढण्यात आले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.

हेही वाचा: 'भाजपनं आधीच बाजी मारलेली आहे...'; चित्रा वाघ यांचं ट्विट

Web Title: Police Case Filed In Navneet Rana Photo Leak At Lilavati Hospital Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :navneet rana
go to top