Aadhaar-Pan Linking | पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? 31 मार्च आहे शेवटची तारीख; अन्यथा… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar-Pan Linking

पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय? 31 मार्च आहे शेवटची तारीख; अन्यथा…

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. फायनान्सशी संबंधित अनेक गोष्टींची डेडलाइन या दिवशी संपत आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख देखील 31 मार्च 2022 आहे. काही कारणास्तव 31 मार्चपर्यंत आधार आणि पॅन लिंकिंग न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल का? हा प्रश्न तुमच्याही मनात घोळत असेल तर त्याचे उत्तर जाणून घ्या.

तर जे लोक 31 मार्च 2022 पर्यंत पॅनला आधारशी लिंक करणार नाहीत त्यांना 500 ते 1,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. मात्र, असे पॅन मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित असतील आणि करदात्यांना ते आयकर रिटर्न भरण्यासाठी, परतावा मिळण्यासाठी आणि इतर आयकर कामासाठी वापरता येतील. मात्र, आधारशी पॅन लिंक न केल्यास, 31 मार्च 2023 नंतर पॅन निष्क्रिय होईल. याचा अर्थ असा की लिंकिंग केले नाही तर, एक वर्षानंतर तुमचा पॅन निष्क्रिय होऊ शकतो

हेही वाचा: महागाईच्या प्रश्नावर भडकले रामदेव बाबा; म्हणाले, "चुप हो जा, आगे पुछेगा तो…"

आकडेवारीनुसार, 24 जानेवारी 2022 पर्यंत 43.34 कोटी पॅन आधारशी जोडले गेले आहेत. आतापर्यंत 131 कोटी आधार कार्ड जारी करण्यात आले आहेत. पॅन-आधार लिंकिंगमुळे 'डुप्लिकेट' पॅन सिस्टीममधून हटवणे आणि करचोरी रोखण्यात मदत होईल.

PAN चा वापर बँक खाते उघडण्यासाठी, स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा ओळखीचा पुरावा म्हणून केला जातो. जे करदाते पॅन कार्ड आधारशी लिंक करत नाहीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

हेही वाचा: शाहबाज शरीफ कोण आहेत? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत

आधारशी पॅन लिंक कसे करावे:

सर्वप्रथम, आयकर वेबसाइटवर जा. त्यानंतर आधार लिंक सेक्शनवर क्लिक करा. आता पुढील स्टेप्समध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि नाव एंटर करा. त्यानंतर लिंक आधार यावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा आधार पॅन लिंक केला जाईल..

हेही वाचा: रेडमीचे तीन नवे स्वस्तात मस्त 5G फोन लॉंच; पाहा किंमती अन् फीचर्स

Web Title: Pan Card Will Become Inactive Attract Penalty After March 2023 If It Is Not Linked With Aadhaar Check Detail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pan cardAadhaar Card