पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना ! | Paracetamol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paracetamol Tablet Price

पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना !

पॅरासिटामॉल-कॅफिनची गोळी आता मिळणार अवघ्या २.८८ रुपयांना, ८४ औषधांची किंमत झाली निश्चित,आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही!

औषध (Medicine) किंमत नियामक (NPPA) यांनी मधुमेह, डोकेदुखी आणि उच्च रक्तदाब यांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या ८४ औषधांसाठी किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासाठी फॉर्म्युलेशनच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. (Paracetamol Tablet Price Now Buy Only 2.88 Rupees)

हेही वाचा: औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी

NPPA ड्रग्ज (किंमत नियंत्रण) आदेशनुसार २०१३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. त्यांच्या पत्रकाच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, व्होग्लिबोज आणि (SR) मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराईडच्या एका टॅब्लेटची किंमत जीएसटी वगळून १०.४७ रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅरासिटामॉल आणि कॅफिनच्या एका गोळीची किंमत २.८८ रुपये निश्चित करण्यात आली आहे. या शिवाय एका रोसुवास्टॅटिन ऍस्पिरिन आणि क्लोपीडोग्रेल कॅप्सूलची किंमत १३.९१ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोविड होऊन गेल्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण

पुढे NPPA ने सांगितले की त्यांनी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इनहेलेशनची सुधारित कमाल मर्यादा या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

Web Title: Paracetamol Tablet Price Now Buy Only 288 Rupees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PharmacyMedicines