पतंजलीचं आलं 'क्रेडीट कार्ड'; जाणून घ्या काय आहे खासियत

आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांची घोषणा
Baba Ramdev  Acharya Balkrishna
Baba Ramdev Acharya Balkrishna

नवी दिल्ली : आयुर्वेदिक औषधं आणि खाद्यपदार्थ बनवणाऱ्या पंतजलीनं आता बँकिंग व्यवसायातही उडी घेतली आहे. त्यानुसार, आता पतंजलीचं क्रेडीट कार्ड लॉन्च करण्यात आलं आहे. देशातील मोठी सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्यानं पंतजली ब्रँडखाली हे क्रेडिट कार्ड बाजारात आणण्यात आलं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्लॅटफॉर्मवर ते लॉन्च करण्यात आलं आहे. या क्रेडिट कार्डवर तीन प्रकारचे लाभ ग्राहकांना मिळणार आहेत. (Patanjali credit card to come now Find out what are special feature)

पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे कार्यकारी संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी सांगितलं की, आमचा हा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी निगडीत आहे. त्यामुळं या संकल्पनेला मोठं बूस्ट मिळेल. आमच्या क्रेडिट कार्डचा फायदा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर होईल. एक कोटी लोकांपर्यंत हे क्रेडिट कार्ड पोहोचवण्याचं आमचं टार्गेट आहे.

पंतजलीच्या क्रेडिट कार्डवर मिळणार हे फायदे

पंतजलीच्या क्रेडिड कार्डची खर्चाची मर्यादा १० लाख रुपये असणार आहे. या क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट ४९ दिवस असणार आहे. त्याचबरोबर या क्रेडिट कार्डवर ५ लाखांचा अॅक्सिडेंटल वीम्याचं संरक्षणही मिळणार आहे. तसेच या क्रेडिट कार्डवरुन पतंजली आऊटलेट्सवरुन सामान खरेदी केल्यास ५ ते १० टक्के सूट मिळणार आहे. केवळ पतंजलीचं नव्हे तर इतरही निवडक ब्रँडच्या खरेदीवरही सूट मिळणार असल्याचं आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं.

पतंजली क्रेडिट कार्डचे दोन प्रकार

पतंजली क्रेडिड कार्डचे दोन प्रकार लॉन्च करण्यात आले आहेत. एक क्रेडिट कार्ड हे 'पीएनबी रुपे प्लॅटिनम' आणि दुसरं कार्ड 'पीएनबी रुपे सिलेक्ट' असं आहे. पीएनबी रुपे प्लॅटिनम कार्डची जॉईनिंग फी नाही. पण वार्षिक फी ५०० रुपये असणार आहे. तर पीएनबी सिलेक्ट कार्डसाठी ५०० रुपये जॉईनिंग फी आणि ७५० रुपये वार्षिक फी असणार आहे. हे दोन्ही क्रेडिट कार्ड पतंजली स्टोअर आणि पीएनबीच्या शाखेत जाऊन घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com