इंद्रा नूयी होणार पायउतार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

न्यूयॉर्क - ‘पेप्सिको’ या अमेरिकन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी ३ ऑक्‍टोबर रोजी आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. नूयी यांच्यानंतर कंपनीचे अध्यक्ष रामोन लाग्वार्टा सीईओपदाचा कार्यभार सांभाळणार असून, त्यांची संचालक मंडळावर निवड केल्याची माहिती कंपनीने आज दिली. इंद्रा नूयी यांनी गेली १२ वर्षे कंपनीच्या ‘सीईओ’पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतात लहानाची मोठी होत असताना भविष्यात कधी इतक्‍या मोठ्या कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया इंद्रा नूयी यांनी दिली.

न्यूयॉर्क - ‘पेप्सिको’ या अमेरिकन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी ३ ऑक्‍टोबर रोजी आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. नूयी यांच्यानंतर कंपनीचे अध्यक्ष रामोन लाग्वार्टा सीईओपदाचा कार्यभार सांभाळणार असून, त्यांची संचालक मंडळावर निवड केल्याची माहिती कंपनीने आज दिली. इंद्रा नूयी यांनी गेली १२ वर्षे कंपनीच्या ‘सीईओ’पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतात लहानाची मोठी होत असताना भविष्यात कधी इतक्‍या मोठ्या कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया इंद्रा नूयी यांनी दिली. त्यांनी हा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PepsiCo CEO Indra Nooyi to Step Aside