
मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये तर, डिझेल ९७.२८ रुपये प्रतिलीटर
Today's Petrol & Diesel Price Updates: आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलीटर आहे. जवळपास गेला महिनाभर हे दर स्थिर आहेत. त्यात वाढ किंवा घट झालेली नाही.
हेही वाचा: पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग
आज पुण्यात पेट्रोलचा दर १११.४३ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९५.९० रुपये प्रतिलीटर आहे. यात अनुक्रमे ०.६१ रुपये आणि ०.५९ रुपयांची घट झालेली दिसून आली. नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालच्या तुलनेत स्थिर आहेत. पेट्रोलची किंमत १११.०७ रुपये तर डिझेलची किंमत ९५.५८ रुपये आहे.
औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत १११.९९ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९६.४४ रुपये आहे. दिल्लीत कालच्या तुलनेत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे.
हेही वाचा: ‘पेट्रोल-डिझेलची पावती करांच्या नोंदीसह द्यावी’
आंध्रप्रदेशात डिझेलची किंमत आज ९९.४३ रुपये आहे. काल ही किंमत ९९.४१ रुपये होती. त्यामुळे किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येथे पेट्रोलची किंमत १११.७० रुपये आहे.
Web Title: Petrol And Diesel Price On 4 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..