esakal | #petrolPrice: पेट्रोलच्या दरात 50 दिवसानंतर वाढ; डिझेलही महागले
sakal

बोलून बातमी शोधा

petrol.

आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते

#petrolPrice: पेट्रोलच्या दरात 50 दिवसानंतर वाढ; डिझेलही महागले

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने डिझेलच्या किंमतीत तब्बल 41 दिवसांनी वाढ झाली आहे तर 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या किंमतीतही वाढ झाली. शुक्रवारी डिझेलचे भाव 22 ते 25 पैशांनी वाढले, तर पेट्रोलचे दर 17 ते 20 पैशांनी वाढले आहेत.

IOCL च्यामते प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर:
 शहर          डिझेल    पेट्रोल
दिल्ली          70.68    81.23
कोलकाता    74.24    82.79
मुंबई             77.11    87.92
चेन्नई             76.17    84.31 

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या-
आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमचा सिटी कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कळतील प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

दररोज सहा वाजता किंमती बदलतात-
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होत असतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात.

(edited by- pramod sarawale)

loading image