Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; माहिती करून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 3 December 2020

आज सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. 

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

आईओसीएल (Indian Oil Corporation- IOCL) च्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई शहरांतील पेट्रोल- डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत

शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली  72.84 82.66
कोलकाता 76.41 84.18
मुंबई 79.42 89.33
चेन्नई  78.24 85.59

(पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर आहेत)

मागील काही दिवस पेट्रोल दर 50 दिवस तर डिझेलचे दर 42 दिवस स्थिर होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसला आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर 82.66 रुपये तर डिझेलचे दर 72.84 रुपये आहेत.

Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या कशा माहित कर जाणून घ्या-
आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमचा सिटी कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कळतील प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

दररोज सहा वाजता किंमती बदलतात-
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होत असतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol and diesel prices increased said by iocl