Signs of economic revival: क्रेडिट कार्डच्या मागणीत होतेय वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

बिगर मेट्रो शहरांत क्रेडिट कार्डचे ग्राहक वाढत आहेत.

नवी दिल्ली: कोरोनाकाळात भारताची अर्थव्यवस्था मंद झाल्याचे दिसले होते. पण आता काही प्रमाणात देशाच्या अर्थचक्रला गती येताना दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे लक्षण म्हणजे 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात क्रेडिट कार्डची (Credit Card) विचारपूस करणाऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. ती 106 टक्क्यांपर्यंत गेली आहे. यावरून असे दिसून येत आहे की कोविड-19 मुळे अर्थव्यवस्था खुली होत असल्याने आर्थिक हालचाली सुधारत आहेत.

छोट्या शहरांमध्ये लोकप्रियता वाढतेय-
देशातील इंफॉर्मेशन ऍंड इनसाइट क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रान्सयुनियन सीबील  (TransUnion CIBIL) कंपनीच्या आकडेवारीनुसार, बिगर मेट्रो शहरांमध्येही क्रेडिट कार्डची लोकप्रियता वाढत आहे. ही शहरे पारंपरिक पद्धतीने अधिक रोख रकमेचा वापर करत असतात पण आता तिथंही डिजीटल पेमेंट वाढताना दिसत आहेत. सध्या मेट्रो शहरांत रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटचा जास्त वापर होतोय.

Tata Motorsची भन्नाट आयडिया; नवीन कारची 'सेफ्टी बबल'द्वारे विक्री

बिगर मेट्रो शहरांत क्रेडिट कार्डचे ग्राहक वाढत आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये क्रेडिट कार्डची माहिती (Enquiry for credit cards) जाणून घेण्यामध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या तुलनेत मेट्रो किंवा मोठ्या शहरांतील क्रेडिट कार्डची चौकशी 10 टक्क्यांनी कमी झाली आहे.

क्रेडिट कार्डांच्या संख्येत वाढ-
TransUnion CIBILच्या मते, अर्थव्यवस्थेत क्रेडिट कार्डच्या मागणीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच नवीन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्याही वाढत आहे. जुलै महिन्यात जारी करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डची संख्या 2019 च्या जुलै  महिन्या इतका झाला आहे. लॉकडाऊनच्या काळातही एप्रिल 2020 मध्ये क्रेडिट कार्डची घसरण वेगवान नव्हती. त्याकाळात फक्त 9 टक्क्यांची घट दिसली होती.

खुशखबर! Ola-Uber ने प्रवास करणाऱ्यांना सरकारने दिलं गिफ्ट; नियमांत बदल

सणासुदीच्या काळात उलाढाल वाढतील-
ट्रान्सयुनियन सिबिलचे उपाध्यक्ष अभय केळकर म्हणतात की, लॉकडाऊनच्या उपाययोजना शिथिल केल्यानंतर क्रेडिट कार्डांची चौकशी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चौकशीची करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भविष्यात सणासुदीच्या काळात बाजारातील उलाढाली वाढतील.

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs of economic revival credit card demand increases