esakal | Petrol Diesel Price - पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ कपात
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel hike

गेल्या महिन्यात शंभरी गाठलेल्या पेट्रोलचे दर आता कमी होत आहेत. आता चार दिवसांनी पुन्हा एकदा इंधन तेलाचे दर घसरले आहेत. 

Petrol Diesel Price - पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ कपात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - गेल्या महिन्यात शंभरी गाठलेल्या पेट्रोलचे दर आता कमी होत आहेत. आता चार दिवसांनी पुन्हा एकदा इंधन तेलाचे दर घसरले आहेत. फेब्रुवारीध्ये 10 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत तेल दरामध्ये वाढ झाली होती. जवळपास 4 ते 5 रुपयांनी वाढ झाल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर झाले होते. 26 फेब्रुवारीनंतर फक्त 27 फेब्रुवारीला इंधन दरात किरकोळ वाढ झाली होती. दरम्यानच्या काळात क्रूड ऑइलचे दर 8 डॉलरने वाढले. तरीही तेलाचे दर तेवढेच राहिले. गेल्या आठवड्यापासून या दरामध्ये किरकोळ घसरण होतना दिसत आहे.

मंगळवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असून पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 23 पैसे प्रति लिटर स्वस्त झालं. यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर 90 रुपये 56 पैसे तर डिझेलचे दर 80 रुपये 87 पैसे इतके झाले. मुंबईत पेट्रोल 96 रुपये 98 पैसे तर डिझेल 87 रुपये 96 पैसे इतके आहे. याआधी 24 आणि 25 मार्चला पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली होती. या दोन दिवसांमध्ये मिळून पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झालं होतं. 

हे वाचा - ‘इसॉप’नीती आणि कर्मचारी

दिल्ली, मुंबई शिवाय देशातील इतर शहरांमध्येही पेट्रोल डिझेलचे दर 90 रुपयांच्या वर आहेत. सर्वाधिक महाग पेट्रोल भोपाळमध्ये असून एक लिटर पेट्रोलची किंमत 98.58 रुपये इतकी आहे. तर डिझेलचा दर 89 रुपये 13 पैसे प्रति लिटर इतका आहे. चेन्नई आणि पाटण्यात पेट्रोलचे दर 92 रुपयांपेक्षा जास्त असून डिझेल 85 रुपयांपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. चंदिगढमध्ये पेट्रोल 87 रुपये 14 पैसे प्रति लिटर असून डिझेल 80 रुपये 57 पैसे दराने विकले जात आहे. 

अर्थ विश्वातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इंधनाचे दर दरदिवशी सकाळी बदलतात. सकाळी सहाच्या सुमारास नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डीलर कमीशन आणि इतर दर लागू केल्यानंतर मूळ किमतीच्या दुप्पट किंमत यासाठी मोजावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत यांच्यावर तेलाच्या किंमती आधारलेल्या असतात. 

loading image
go to top