esakal | पुन्हा दरवाढ! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price

पुन्हा दरवाढ! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलच्या किंमतींमध्ये 33 ते 38 पैश्यांनी तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 30 ते 35 पैश्यांनी वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांहून अधिक झाली आहे. देशात दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढतानाच दिसत आहेत. याचा परिणाम सामान्यांच्या आर्थिक नियोजनावर होताना दिसत आहे.

हेही वाचा: आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 105.14 रुपये तर डिझेलचे भाव 93.87 रुपये प्रती लीटर झाले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 111.09 रुपये तर डिझेलची किंमत 101.78 रुपये प्रती लीटर झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 105.76 रुपये तर डिझेलचे दर 96.98 रुपये प्रती लीटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.40 रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर 98.26 रुपये प्रती लीटर आहे.

प्रमुख शहरांत असे आहेत दर

शहर डिझेल पेट्रोल

दिल्ली 93.87 105.14

मुंबई 101.78 111.09

कोलकाता 96.98 105.76

चेन्नई 98.26 102.40

(पेट्रोल-डिझेलच्या किंमती रुपये प्रती लीटरमध्ये आहेत.)

हेही वाचा: पुन्हा केंद्र विरुद्ध राज्ये; ‘बीएसएफ’च्या अधिकार क्षेत्रात वाढीमुळे वादंग

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडीसा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

तुमच्या शहरात किती आहे दर?

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 क्रमांकावर पाठवावं लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाईटवर मिळेल.

या लिंकवर जाऊन जाणून घ्या भाव- https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx

loading image
go to top