Petrol-Diesel Price: जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती

Petrol-diesel prices rising
Petrol-diesel prices risingsakal
Updated on

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेललच्या किंमती वाढवलेल्या नाहीयेत. अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात येत असून आज त्यापासून सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाहीये. काल गुरुवारी देखील याप्रकारची कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे कोणतीच वाढ न झालेला हा सलग दुसरा दिवस आहे.

Petrol-diesel prices rising
नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग

तेल कंपन्यांनी २२ मार्चपासून आतापर्यंत १४ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत यादरम्यान दोन्हीही इंधन जवळपास १० रुपयांनी महाग झालेलं आहे. याआधी ४ नोव्हेंबर २०२१ नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ केली नव्हती. या दरम्यान पाच राज्यांमधील निवडणुकाही सुरु होत्या. गेल्या अठरा दिवसांमध्ये चार दिवस वगळता दर दिवशी हे दर वाढवले आहेत.

Petrol-diesel prices rising
आ.आवताडेची रेल्वेमंत्र्याशी दुसऱ्यांदा भेट,ग्रीन सिग्नल कधी मिळणार?

काल गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आजदेखील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे सलग दोन दिवस देशांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या मुंबईत पेट्रोलची किंमत 120.51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 104.77 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com