पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील दर

disel petrol
disel petrol

Petrol, diesel prices today : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर (No Change) पेट्रोल आणि डिझेलच्य किंमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 20 दिवस इंधन दरवाढीच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर पाच राज्याच्या निवडणूकीनंतर पुन्हा एकदा दरवाढ झाली. लागोपाठ पाच दिवस दरवाढ झाल्यानंतर शनिवार-रविवार इंधनाच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी पेट्रोल प्रतिलीटर 26 पैसे तर डिझेल प्रति लीटर 33 पैशांनी महागलं. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 91.53 रुपये तर डिझेल 82.06 रुपये प्रति लीटरवर पोहचलं. (Petrol, Diesel Prices Hiked After A 2-Day Pause)

पाच दिवसांत 1.16 रुपयांनी महागलं पेट्रोल -

पाच राज्यातील निवडणूकांमुळे (Assembly Election) दोन महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर पाहायला मिळाल्या होत्या. कच्च तेल महागल्यनंतरी (Crude Oil Dearer) इंधन (Petrol-Diesel Price) दरवाढ झाली नव्हती. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांमध्ये पेटोल 1.16 रुपयांनी महागलं आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोलचे भाव (प्रति लीटर)

दिल्ली 91.53

मुंबई 97.86

चेन्नई 93.60

कोलकाता 91.66

भोपाळ 99.55

रांची 88.76

बेंगळुरु 94.57

पाटना 93.77

चंडीग 88.05

लखनऊ 89.56

प्रमुख शहारतील डिझेलचे दर (प्रति लीटर)

दिल्ली 82.06

मुंबई 89.17

चेन्नई 86.96

कोलकाता 84.90

भोपाळ 90.36

रांची 86.69

बेंगळुरु 86.99

पाटना 87.27

चंडीगढ 81.73

लखनऊ 82.43

disel petrol
लॉकडाऊन काळात पेट्रोल विक्रीत ६० टक्के घट, पंपचालकांचे होतेय नुकसान

आपल्या शहरात काय आहेत भाव?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com