esakal | लॉकडाऊन काळात पेट्रोल विक्रीत ६० टक्के घट, पंपचालकांचे होतेय नुकसान

बोलून बातमी शोधा

petrol.
लॉकडाऊन काळात पेट्रोल विक्रीत ६० टक्के घट, पंपचालकांचे होतेय नुकसान
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : गेल्या दीड महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. शहर व जिल्ह्यात केवळ ४० टक्के इंधन विक्री होत असून ६० टक्के विक्रीवर परिणाम जाणवला आहे. यामुळे पंपचालकांना इंधन कंपन्यांकडून कमिशन स्वरूपात मिळणारे उत्पन्नातही घट झाली असून कर्मचाऱ्यांचे पगारही काढणे अवघड झाल्याची प्रतिक्रिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणूक : शपथपत्र दाखल करण्यास चार आठवड्यांची मुदत

शहरात मार्च महिन्यापासून अंशत: लॉकडाऊन लावण्यात आलेला आहेत. या माध्यमातून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतही घट होत गेली. सध्या केवळ अत्यावश्‍यक सेवांच्या वाहनांना इंधन दिले जात आहे. सर्वसामान्यांसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत पेट्रोल देण्यात येते. या विषयी आम्ही सूचनाही काढण्यात आल्या होत्या, असेही अखिल अब्बास म्हणाले. दीड महिन्यांपासून इंधनाची विक्री घटली आहे. यात प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन दिवसाला एक टॅंकर लागायचे. आता पाच ते सात दिवसाआड एक टॅंकर लागतो. यामुळे कंपन्यांनी पंप चालकांना नियमित देण्यात येणारे कमिशन या संकटाच्या काळातही सुरु ठेवावीत. यासह सरकारनेही पंपचालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही पेट्रोल-डिलर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.