esakal | Petrol Diesel Price: इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

Petrol Diesel Price: इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर:Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेल यांच्या दरात रोज वाढ होत आहे. परिणामी, वाहतूक खर्च वाढून त्याचा परिमाण इतर क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या जवळपास वस्तूंची भाव वाढ झाली आहे. शिवाय घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचे (LPG gas) भावही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे नियोजन कोलमडले असून, ते मेटाकुटीस आले आहेत.

कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाउनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेकजण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने घाला घातला आहे. यात सर्वाधिक कोंडी झाली ती शेतकऱ्यांची. त्यांच्या मालाला अल्पभाव मिळत आहे. पेट्रोलचे भाव प्रतिलीटर शंभरच्याही पुढे गेले आहेत. डिझेलचेही शंभर रुपयांच्या जवळपास झाले आहे.

हेही वाचा: IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने देशी गोवंशवृद्धी, १३ कालवडींचा जन्म

डिझेल आणि पेट्रोलच्या भाववाढीची जणू काय स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात कमाईपेक्षा खर्च जास्त होत असल्याने नागरिकांना व्याजाने पैसे घेऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे. शिवाय त्यात मोबाइल बिलाचीही भर पडली आहे. मुलांच्या ऑनलाइन शाळांसाठी मोबाइल आवश्यक झाला आहे. त्यामुळे खर्चही वाढला आहे. परिणामी, केंद्र सरकारप्रति रोष व्यक्त केला जात आहे.

loading image