esakal | IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने देशी गोवंशवृद्धी, १३ कालवडींचा जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - खुलताबाद तालूक्यातील सुल्तानपुर शिवारात श्री. भद्रा डेअरी फार्मच्या मुक्त संचार गोठ्यातील देशी वंशाच्या गीर गायी.

IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने देशी गोवंशवृद्धी, १३ कालवडींचा जन्म

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : देशी वंशाच्या गायी Govansh कमी दूध देतात. या कारणामुळे अधिक दूध देणाऱ्या संकरित गायी Cow पाळण्याकडे ओढा आहे. त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यातील भद्रा डेअरी फार्मने मार्ग काढला आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन, भ्रूण प्रत्यारोपण) In Vitro Fertilization तंत्रज्ञानाने संकरित गायींपेक्षा अधिक दूध देणाऱ्या देशी गायींच्या वंशवृद्धीसाठी यशस्वीपणे प्रयत्न केले जात आहेत. या तंत्रज्ञानाने जन्मलेल्या सध्या १३ कालवडी असून आणखी चार कालवडींची लवकरच भर पडणार आहे. मराठवाड्यात Marathwada असा हा पहिलाच प्रयोग असून तो पशुपालकांसाठी Dairy Farming वरदान ठरणारा आहे.आईचे दूध अमृत असते. आईच्या दुधातून बाळाला मिळणारे घटक देशी गायीच्या दुधातून मिळतात. देवणी Deowani, लाल कंधारी Lal Kandhari, गीर Gir, थारपारकर Tharparkar, सहिवाल Sahiwal या आहे देशी गायींचे वंश. यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील लाल कंधारी, देवणी (जि. लातूर) तालुक्यातील देवणी जातीच्या गायी दुधाच्या गुणवत्तेसह शेतीकामासाठी काटक, मजबूत वळू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ivf treatment use for govansh growth in khultabad tahsil of aurangabad glp88

हेही वाचा: औरंगाबादकर तरुणाचे मोठे यश, पटकावले २५०० युएस डाॅलरचे पारितोषिक

मात्र या देशी वंशाच्या गायी कमी दूध देतात म्हणून त्या पाळण्याचा प्रमाण कमी झाले. जास्त दूध देणाऱ्या जर्सी, एचएफ या संकरित गायी पाळण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यामुळे देशी गोवंश संकटात आला. आईच्या दुधाला जेवढे न्युट्रिशियन मूल्य असते, तेवढेच ते देशी गायीच्या दुधाला आहे. देशी गायीच्या दुधात ए -२ नावाचे अतिशय मौल्यवान प्रोटीन असते. त्यामुळे देशी गायींची वंशवृद्धी वाढावी, पालनाकडे ओढा वाढावा. यासाठी सरोगसी Surrogacy पद्धतीने मार्ग काढता येऊ शकते, हे सुलतानपूर (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) Aurangabad येथील श्री. भद्रा डेअरी फार्मने सिद्ध केले आहे.

हेही वाचा: आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल

वर्षभरापूर्वी प्रयोग

या प्रयोगासाठी एका वेतात चार हजार लिटर दूध देणाऱ्या शिरूर तालुक्यातील (जि. पुणे) गोदावरी नामक गायीची निवड करण्यात आली. एका वेतात चार हजार ८०० लिटर दूध देणाऱ्या वंशावळीतील ‘विवेक’नामक वळूचे बीजांड एकत्र करून ते शिरूर येथील जे.के. ट्रस्टच्या प्रयोगशाळेत वाढवण्यात आले. दोन महिन्यांनी ते श्री भद्रा डेअरीतील एका वेतात एक हजार ते एक हजार २०० लिटर दूध Milk देणाऱ्या ‘गोमती’नामक गीर गायीत कृत्रिम रेतनाद्वारे सोडण्यात आले. या तंत्राने जन्मलेल्या कालवडीला ‘अलेक्सा’ नाव देण्यात आले. आता ती वर्षाची झाली आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाने हे शक्य झाले. ‘अलेक्सा’ एका वेतात किमान चार हजार लिटर दूध देईल, असे सांगितले जात आहे. या तंत्रज्ञानाने इथे जन्मलेल्या कालवडींची संख्या सध्या १३ वर पोचली आहे. काही दिवसांत आणखी चार कालवडींची भर पडेल. दरम्यान, या फार्ममधील देशी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ८० रुपये भाव मिळतो. मानवी स्पर्शरहित, भेसळरहित दूध बाटलीबंद करून शहरात पाठवले जाते. या दुधाला खूप मोठी मागणी आहे.

हेही वाचा: उस्मानाबादेत पावसाच्या मोजमापाची अचूकता येईना!

ब्राझीलमध्ये संशोधन आणि…

या संदर्भात भद्रा फार्मचे डॉ. बी. बी. चव्हाण म्हणाले, ‘फार पूर्वी गुजरातमधून गीर जातीचे वळू ब्राझीलमध्ये नेले होते. तेथे त्यांच्यावर संशोधन करून, ब्रिडिंग करून उत्तम दर्जाचा गीर जातीचा वळू तयार करण्यात आला. याच संशोधनाचा उपयोग येथेही केला जात आहे. एका वेतात १३ हजार लिटर दूध देणाऱ्या गायीच्या पोटी जन्मलेल्या ब्राझीलमधील गीर जातीच्या वळूचे सिमेन आणि गायीचे बीजांड प्रयोगशाळेत वाढविण्यात आले. ते फार्ममधील गायींच्या गर्भात कृत्रिम रेतनाद्वारे सोडून ते वाढवण्यात आले. याद्वारे नुकत्याच पाच कालवडी जन्मल्या. गीर गाय एका वेतात साधारणतः १९०० ते २००० लिटर दूध देते. आता या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जन्मलेली गाय एका वेतात किमान सहा ते सात हजार लिटर दूध देईल.

loading image