भारतात पेट्रोल, डिझेलचा भडका उडण्याची शक्यता, कारण 

टीम ईसकाळ
Friday, 3 January 2020

वॉशिंग्टन: अमेरिकेने गुरुवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी मारले गेल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड 4.4 टक्क्यांनी वधारून 69.16 डॉलरवर आणि  वेस्ट टेक्सस क्रूड ऑइल 4..3 टक्क्यांनी वाढून 63.84 वर पोचले  आहे. 

वॉशिंग्टन: अमेरिकेने गुरुवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी मारले गेल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड 4.4 टक्क्यांनी वधारून 69.16 डॉलरवर आणि  वेस्ट टेक्सस क्रूड ऑइल 4..3 टक्क्यांनी वाढून 63.84 वर पोचले  आहे. 

इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कासिम सुलेमानी ठार झाला आहे. त्यामुळे तेल उत्पादक पश्चिम आशियाई देशात संघर्षाची ठिणगी पडून त्याचा तेल उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ओपेक गटात सौदी अरेबियानंतर कच्च्या तेलाचे उत्पादन करणारा इराण हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तसेच भारतातील तेलाची गरज भागविण्यासाठी लागणारे तब्बल 10 टक्के तेल इराणकडून आयात केले जाते. या पार्श्वभूमीवर भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. भारतात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तळाशी जोडले गेल्याने त्याचा दृश्य परिणाम लगेच जाणवण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजार देखील मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 200 अंशांनी घसरून 41 हजार 414 अंशांवर पोचला होता. तर निफ्टीमध्ये  65 अंशांची घसरण झाली. तो 12 हजार 213.80 वर व्यवहार करत होता. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या दराशी प्रत्यक्षसंबंधित असलेल्या विमान वाहतूक कंपन्या, पेंट्स, ऑटो कंपन्या मोठ्या प्रमाणात घसरून व्यवहार करत आहेत.

इंडिगोची प्रवर्तक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा शेअर 30 रुपयांपेक्षा जास्त घसरून व्यवहार करत होता. तर स्पाइस जेट 6 टक्यांनी घसरला आहे. दुसरीकडे एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स सहित इतर अनेक कंपन्यांचे शेअर देखील मोठया दबावात व्यवहार करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol diesel prices jump after crude oil rates soar 4 percent