दिल्लीत पेट्रोल पंपचालक संपावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४०० पेट्रोलपंपचालक सहभागी झाले आहेत. आज पेट्रोल पंप बंद राहिल्याने दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसला. 

लगतच्या राज्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत इंधनाचे दर कमी असल्याने दिल्लीतील नागरिक तिकडे धाव घेत आहेत. परिणामी इंधन विक्री घटली असून, दिल्ली सरकारने मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी पेट्रोल पंपचालकांची मागणी आहे. हा संप उद्यापर्यंत (ता. २३) सुरू राहणार असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपाला केंद्राची फूस असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दरात कपात सुरूच
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोलमध्ये ३०, तर डिझेलमध्ये २७ पैशांची कपात करण्यात आली. कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ८१.३४ रुपये असून, मुंबईत तो ८६.९१ रुपये आहे. दिल्लीत डिझेलची ७४.९२ रुपये प्रतिलिटर दराने विक्री सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Pump Owner on Strike