PF खातेदारकांनो, टेन्शन सोडा! Covid Advanceची रक्कम पुन्हा काढता येणार

कारण यामुळे भागधारकांना त्यांच्या खात्यातून 75 टक्क्यांपर्यंत अॅडव्हान्स रक्कम काढता येणार आहे.
PF account transferred
PF account transferredesakal
Summary

ती योजना नोकरदार वर्गासाठी पुन्हा एकदा सुरु करण्यात आलीय.

नोकरी (Job) करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता तुम्हाला पीएफ (PF) खात्यातून अॅडव्हान्स रक्कम काढता येणार आहे. कोरोनाच्या काळात पीएफ खातेधारकांना अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा मिळतेय. ती योजना नोकरदार वर्गासाठी पुन्हा एकदा सुरु करण्यात आलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निभी संघटनेने पीएफ खातेधारकांना मोठा दिलास दिलाय. कारण यामुळे भागधारकांना त्यांच्या खात्यातून 75 टक्क्यांपर्यंत अॅडव्हान्स (Advance) रक्कम काढता येणार आहे.

PF account transferred
EPFO: पीएफ खात्याशी संबंधित हे आहेत 6 फायदे

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना (Corona) व्हायरसमुळे नोकरदार वर्गाचे खूप हाल झालेत. त्या दिवसात काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काही कर्मचाऱ्यांना कमी वेतनावर काम करावे लागले आहे. अजूनही कोरोनाची भिती कमी झालेली नाहीयेय. त्यामुळे कधीही कुणालाही पैशांची गरज पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अचानक मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासली तर त्या व्यक्तीला पीएफ खात्यामधून अॅडव्हान्स रक्कम काढता येणार आहे. तुम्हाला ही रक्कम काढायची असेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही काढू शकता. यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने याविषयीच सुविधा पुन्हा सुरु केली आहे.

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, पीएफचे भागधारक स्वत: किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी किंवा कोरोना नंतरच्या उपचारासाठी ही अॅडव्हान्स रक्कम घेऊ शकतात. यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्यावेळी अॅडव्हान्स रक्कम काढलेली होती. त्या कर्मचाऱ्यांनाही पीएफ खात्यातील शिल्लक रकमेतून अॅडव्हान्स रक्कम काढता येणार आहे. यासंदर्भातील माहिती तीन दिवसांत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती देण्यात आलीय.

PF account transferred
पीएफ, वेतन फरकापासून ‘आरोग्यदूत’ वंचित

कोविड अॅडव्हान्स मिळवण्यासाठी लाभार्थी सदस्याला क्लेम फार्म भरावा लागेल. ज्यामध्ये मागितलेला तपशील भरावा लागणार आहे. यासंबंधित तपशील भरल्यानंतर हा क्लेम (दावा) ऑनलाईन माध्यमातूनच ईपीएफओकडे पाठवावा लागेल. क्लेम जमा होताच लाभार्थीला नोंदणीकृत बॅंक खात्याचा तपशीलही शेअर करावा लागणार आहे. माहितीनुसार या सुविधेचा लाभ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

कोरोनामध्ये बऱ्याचजणांना संकटाना सामना करावा लागला आहे. प्रत्येकाने वाईट दिवस अनुभवलेत. यामुळे प्रत्येकाच्या कामावर परिणाम झाला आहे. ज्यांच्या घरात वृद्ध अथवा आजारी व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी हे दिवस अत्यंत वाइट होते. अशावेळी उपचारांसाठी पैशांची गरज असल्यामुळे कोरोनामध्ये सुरु करण्यात आलेली अॅडव्हान्सची सुविधा यावर्षी सुरु ठेवणे आवश्यक आहे. कारण अशावेळी खातेधारकांचा पैसा त्यांच्या उपयोगाला येईल. असे ईपीएफओ बोर्डाचे सदस्य सुखदेव प्रसाद मिश्रा म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com