Budget 2019 : शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारचा धमाका; मिळणार सहा हजार रुपये

Friday, 1 February 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणूक तोंडावर आली असताना हंगामी अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठी योजना जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये सरकार देणार आहे.

हंगामी अर्थसंकल्पामध्ये पीयुष गोयल यांनी ही घोषणा केली. गेल्या काही निवडणुकांमध्ये शेतकर्‍यांच्या नाराजीचा फटका मोदी सरकारला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता ही तरतूद केली आहे.

गोयल काय म्हणाले?

  • गावाच गावपण टिकवून ठेवून तेथे शहरांप्रमाणे सुविधा पुरविणे हे आमचे ध्येय
  • देशात 22 वे एम्स रुग्णालय हरियानात बनविण्यात येणार आहे
  • शेतकऱ्यांना एमएसपीनुसार मुल्य देण्यात येत आहे
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सरकारने लागू केली आहे
  • दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देण्यात येणार
  • प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे तीन हफ्त्यांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
  • याचा थेट 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला फायदा होणार
  • या वर्षापासून ही योजना लागू करण्यात येणार
  • याचा सरकारवर 75 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे
  • 1 डिसेंबर, 2018 पासून ही योजना लागू करण्यात येणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Piyush Goyal announces financial help to farmers in Budget 2019