Budget 2019 : अर्थसंकल्पात शेरोशायरी नव्हे तर कवितेच्या ओळी...

Friday, 1 February 2019

एक पांव रखता हूँ| हजार राहे फूट पडती है...

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना कवितेच्या दोन ओळी सादर केल्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेरोशायरी नव्हे तर कवीतेच्या ओळी ऐकायला मिळाल्या.

अर्थसंकल्प म्हटले की शेरोशायरीची आठवते. परंतु, गोयल यांनी अर्थसंकल्पाचा समारोप करताना शेरोशायरी सादर न करता कवितेच्या ओळी सादर केल्या. गोयल यांनी महाराष्ट्रीयन कवीची कविता सादर केली. हिंदीतील या विख्यात कवीचा सन्मानपूर्वक उल्लेख करुन ते म्हणाले,

एक पांव रखता हूँ
हजार राहे फूट पडती है...

टाळ्यांच्या गजरात आणि वाह वा च्या जल्लोषात कवितेच्या दोन ओळींचे कौतुक केले. गोयल म्हणाले, हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नाही, तर देशाच्या विकासाची यात्रा आहे. हा जो देश बदलत आहे, देशवासियांच्या उत्साहाने बदलत आहे. त्याचे सारे श्रेय आणि यश देशातील जनतेलाच आहे.

आपण नव्या भारताच्या निर्मितीसाठी इतके नवीन सशक्त आणि प्रभावी पाउल उचलले आहे, की आता देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अनंत शक्यतांनी भरलेला देश पाहिला जाऊ शकतो.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Piyush Goyal recites a poem in his speech during Budget 2019