विमान इंधनावरील करात केरळ सरकारकडून कपात

पीटीआय
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. 

तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. 

केरळच्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘राज्यातून देशांतर्गत सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या हा कर २८.७५ टक्के असून, तो ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे राज्याला १०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल. उडाण योजनेतीलच नव्हे तर, उडाण योजनेत समाविष्ट नसलेल्या विमानतळांवरील सेवेलाही सवलत मिळेल.’’

तीन विमानतळांना फायदा 
केरळमधील तिरुअनंतपुरम, कोची आणि करीपूर या तीन विमानतळांवरील सेवेला या सवलतीचा फायदा होईल. नव्याने कार्यान्वित झालेल्या कन्नूर विमानतळावरील सेवा देणाऱ्या कंपन्यांना विमान इंधनावर केवळ एक टक्का कर आकारण्याचा निर्णय राज्यातील सरकारने याआधीच घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plane fuel tax decrease by keral government