डिसेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा; 'या' चुका टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm mode

मोदी सरकार नोंदणीकृत बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.

डिसेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा

देशातील शेतकऱ्यांसाठी 15 डिसेंबरला अच्छे दिन येणार आहेत, कारण मोदी सरकार लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. त्यांना 15 डिसेंबर रोजी बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) दहावा हप्ता मिळणार आहे. मोदी सरकार नोंदणीकृत बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. पण काही वेळा छोट्याशा चुकीमुळे पैसे मिळत नाहीत. तुम्हीही या चुका वेळीच सुधारा.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे ट्रांसफर केले होते. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट ट्रांसफर केली आहे.

हेही वाचा: ZP, पंचायत समिती निवडणुकांच बिगुल वाजलं; आयोगाकडून आदेश जारी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) मोदी सरकारने अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2, 000 रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत नऊ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.

कोणत्या चुका होऊ शकतात हे जाणून घ्या..

- शेतकऱ्यांनी त्यांची नावे इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे. जर तुम्ही हिंदीत नाव लिहिले असेल तर ते दुरुस्त करा.

- अर्ज करताना शेतकऱ्याच्या नावात आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक नसावी.

- बँकेचा IFSC कोड लिहिताना कोणतीही चूक करू नये.

- बँक अकाऊंट नंबर देताना कोणतीही चूक करू नये.

- कृपया तुमचा पत्ता नीट तपासा. जेणेकरून गावाचे स्पेलिंग लिहिण्यात चूक होणार नाही.

या सर्व चुका आधार नंबरद्वारे दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुमचे 2,000 रुपये अडकतील.

- तुमच्या चुका ऑनलाइन अशा प्रकारे सुधारा

हेही वाचा: 'इंदिरा गांधींकडून सावरकरांच्या समर्थनावर काँग्रेसचे काय म्हणणे?'

सगळ्यात आधी तुम्हाला पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, तुम्हाला वरील बज्याला फॉर्मर्स कॉर्नर नावाची एक लिंक दिसेल. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास, आधार एडीटची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता. दुसरीकडे, जर खाते क्रमांक चुकीचा प्रविष्ट केला असेल, तर तुम्ही तो दुरुस्तही करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल.

loading image
go to top