मेहुल चोक्‍सीचे प्रत्यार्पण शक्य

पीटीआय
शुक्रवार, 27 जुलै 2018

नवी दिल्ली - भारत सरकारने कायदेशीर पद्धतीने मेहुल चोक्‍सी याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यास त्यावर विचार होऊ शकतो, असे सकारात्मक संकेत अँटिग्वा सरकारने दिले आहेत. 

‘पीएनबी’ गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सी हा अँटिग्वामध्ये असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने तेथील पारपत्र मिळविल्याचेही उघड झाले आहे. याबाबत तेथील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने कायदेशीर पद्धतीने मेहुल चोक्‍सी याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यास त्यावर विचार होऊ शकतो, असे अँटिग्वा सरकारने म्हटले आहे. 

अँटिग्वा सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चोक्‍सीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. भारत सरकारचा अँटिग्वाशी प्रत्यार्पण करार झालेला नसल्याचा मुद्दाही ही बैठकीत उपस्थित झाल्याचे वृत्तात नमूद केले आहे. 

चोक्‍सी याने जानेवारीमध्ये भारतातून पलायन केले आहे. त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविण्याची विनंती केंद्रीय अन्वेषण विभागाने इंटरपोलकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली जाण्याची शक्‍यता आहे.

नीरव, चोक्‍सीला समन्स 
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांना विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहे. मोदी याने २५ सप्टेंबरला आणि चोक्‍सी याने २६ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

दरम्यान, सक्त वसुली संचालनालयाने दोघांची तीन हजार ५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगीही न्यायालयाकडे मागितली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PNB Non behavioral mehul choksi nirav modi