पीएनबीला 940 कोटी रुपयांचा तोटा

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई: सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सलग दुसऱ्या तिमाहीत तोटा झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेला 940 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेने 343 कोटींचा नफा नोंदवला होता. रिझर्व्ह  बँकेने कर्ज वर्गीकरण नियमांमध्ये केलेला बदल, नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरण आणि एकूणच बॉण्ड पोर्टफोलिओमध्ये झालेल्या खराब कामगिरीमुळे बँकेला तोटा झाला आहे. 

पीएनबीच्या ग्रॉस एनपीएमध्ये वाढ झाली असून ते 18.26 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्यावर्षी याच काळात ते 13.66 टक्के होते. तर नेट एनपीए  8.67 टक्क्यांवरून वाढून 10.58 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्यावर्षी चौथ्या तिमाहीत बँकेने 13,417 कोटी रुपयांचा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मोठा तोटा नोंदवला होता.  

अधिक अर्थविषयक बातम्यांसाठी www.sakalmoney.com ला भेट द्या. 

ज्वेलरी आणि हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेला 13,500 कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतर बँक अडचणीत आली आहे. हा गैरव्यवहार समोर  आल्यापासून आतापर्यंत बँकेच्या शेअर 50 टक्क्यांहुन अधिक घसरण झाली आहे.

 सध्या मुंबई शेअर बाजारात पीएनबीच्या शेअरमध्ये 4.71 टक्क्यांची म्हणजेच 4.25 रुपयांची घसरण झाली असून तो 85.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे रु. 23,782.34 कोटींचे बाजारभांडवल आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PNB posts ₹ 940 crore Q1 loss