पंजाब नॅशनल बॅंकेला 1,019 कोटींचा नफा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबई: पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत 1,018.63 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बॅंकेला 940 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बॅंकेने तरतूदी आणि आपत्कालीन निधीवरील खर्च 2,023.31 कोटी रुपयांवर आणला आहे. मागील वर्षीच्या 5,758.16 कोटी रुपयांच्या तुलनेत यात 64.8 टक्के घट झाली आहे. नफा नोंदवून बॅंकेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बहुतांश विश्लेषकांनी बॅंकेच्या तोट्याचा अंदाज वर्तवला होता. 

पीएनबीचे एकूण थकित कर्ज 18.26 टक्क्यांवरून घटून 16.49 टक्क्यांवर पोचले आहे. तर निव्वळ थकित कर्ज 10.58 टक्क्यांवरून घटून 7.17 टक्क्यांवर पोचले आहे. बॅंकेचे निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न 37 टक्क्यांनी घटून 2,235.46 कोटी रुपयांवरून 1,406.12 कोटी रुपयांवर पोचले आहे.

आज मुंबई शेअर बाजारात पीएनबीचा शेअर 2.50 टक्क्यांनी वधारला असून तो 67.70 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 31 हजार 238.46 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PNB posts profit of Rs 1018 crore despite marginal rise in NPA