esakal | पीएनबी ची सिक्स एस मोहीम ; ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय
sakal

बोलून बातमी शोधा

arthavishwa

पीएनबी ची सिक्स एस मोहीम ; ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्याच्या 75 व्या महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या (Central Goverment) ध्येयधोरणानुसार पंजाब नॅशनल बँकेने (PNB) लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिक्स एस सारखे वेगवेगळे उपक्रम सुरु केले आहेत.

सिक्स एस उपक्रमात स्वाभिमान, समृद्धी, संपर्क, शिखर, संकल्प व स्वागत या मोहिमा आहेत. देशात वित्तसेवांबाबत जनजागृती करणे, पतपुरवठा वाढवणे, सामाजिक सुरक्षितता योजनांचा विस्तार करणे व डिजिटल बँकिंगची वाढ करणे हे त्यामागील हेतू होते. प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना व अटल पेन्शन योजना या योजनांचा प्रसार करण्याबरोबरच ग्रामीण भागात आपले अस्तित्व वाढविण्याचाही बँकेचा प्रयत्न आहे. तर समृद्धी योजनेत कृषीक्षेत्राला पतपुरवठा वाढविला जाईल.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी 'फळबाग योजने'चा लाभ घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

शिखर, संकल्प व स्वागत योजनांमध्ये छोटे व्यापारी व एमएसएमई क्षेत्राला एक जिल्हा एक उत्पादन या योजनेनुसार विशेष व्याजदराची कर्जे दिली जातील. यासाठी वेगळी पथके तयार करण्यात आली असून सामान्य ग्राहकांसाठीही विशेष कर्ज योजना देण्यात आल्या आहेत. पीएनबी वन या मोबाईल अॅपचा तसेच डेबीट कार्ड व एटीएम केंद्रांचा वापर वाढावा यासाठी संपर्क मोहीम राबविली जाईल.

loading image
go to top