पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Post Office Saving Scheme
पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज

पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज

Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत ज्यांना जोखीम कमी आणि चांगला परतावा हवा आहे. पोस्ट ऑफिसची(Post Office) एमआयएस (MIS) ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एकदा गुंतवणूक करून व्याजाच्या स्वरूपात लाभ घेऊ शकाल. या खात्याचे अनेक फायदे आहेत. हे खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही उघडता येते. यात दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होते. यातून तुम्ही मुलांच्या ट्यूशनची फीस नक्कीच भरू शकता.

हेही वाचा: ‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

खाते कुठे आणि कसे उघडायचे

  • कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे पोस्ट ऑफिस खाते (Post Office Monthly Income Scheme Benefits) उघडू शकता.

  • या अंतर्गत, किमान 1000 रुपये आणि कमाल 4.5 लाख रुपये जमा करता येतील.

  • सध्याचा व्याज दर 6.6 टक्के आहे.

  • मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते (MIS बेनिफिट्स) त्याच्या नावावर उघडू शकता.

  • मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल त्याच्यानावे पालक हे खाते उघडू शकतात.

  • योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. त्यानंतर ते बंद केले जाऊ शकते.

  • व्याजाचे कॅलक्युलेशन

हेही वाचा: महावितरणतर्फे ‘एक दिवस एक गाव’ला सुरुवात

जर तुमचे मूल 10 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 6.6 टक्के दराने तुमचे व्याज दरमहा रुपये 1,100 होईल. पाच वर्षांत हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा परतावाही मिळेल. अशा प्रकारे, एका लहान मुलासाठी तुम्हाला 1100 रुपये मिळतील जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top