महावितरणतर्फे ‘एक दिवस एक गाव’ला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitran
महावितरणतर्फे ‘एक दिवस एक गाव’ला सुरुवात

महावितरणतर्फे ‘एक दिवस एक गाव’ला सुरुवात

पुणे : थेट गावात जाऊन महावितरणची सेवा (Maharashtra State Electricity Distribution Company Limited)उपलब्ध करण्याबरोबरच वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या जनजागृतीसाठी महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडलाच्या वतीने ‘एक दिवस एक गाव’ अभियानाला सुरुवात झाली आहे. येत्या रविवारपर्यंत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील ५९ गावांमध्ये या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: आईनेच घेतला पोटच्या दोन चिमुरड्यांचा जीव

ग्रामीण भागामध्ये गावातच महावितरणची वीजसेवा उपलब्ध व्हावी तसेच तक्रारींचे निवारण व विविध योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी ‘एक दिवस एक गाव’ राज्यभरात राबविण्याचा निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतला आहे. यामध्ये एकाच दिवशी एका गावात जाऊन घरगुती, कृषिपंपासह इतर नवीन वीजजोडण्या, वीजबिलांची दुरुस्ती, विविध तक्रारींचे निवारण, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीजग्राहकांना ऑनलाइन ग्राहकसेवा, वीजबचत व सुरक्षा तसेच कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०ची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा: ‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे परिमंडल अंतर्गत हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यांतील सर्व गावांमध्ये या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. आयोजनाबाबत संबंधित गावांतील नागरिकांना पूर्वकल्पना देण्यात येत असून, आवश्यक सर्व साधनसामग्रीसह संबंधित अभियंता व जनमित्रांचे पथक गावात दिवसभर राहणार आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी ग्रामीण मंडलमधील विविध उपविभाग व शाखा कार्यालयांना नुकत्याच भेटी देऊन ‘एक दिवस एक गाव’ अभियानाच्या आयोजनाबाबत सूचना केली आहे. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top