
Post office scheme : छोट्याशा गुंतवणुकीतून दरमहा मिळवा उत्पन्न
मुंबई : जर तुमच्या मुलाचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला त्याच्या नावावर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा लाभ घेता येईल. यासोबतच या योजनेतून मुलांना दरमहा २५०० रुपये मिळतात. तर आता ही योजना सविस्तरपणे समजून घेऊ. (monthly income scheme)
हेही वाचा: SBI देत आहे घरबसल्या दरमहा ८० हजार रुपये कमवण्याची संधी
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
या योजनेत पैशांच्या गुंतवणुकीसह खाते उघडणे महत्त्वाचे आहे. यामध्ये एका खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तसेच, जर संयुक्त खाते उघडले असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतु त्यामध्ये मुदतपूर्व बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
हेही वाचा: Post Office Scheme : विवाहित जोडप्याला मिळणार दरमहा ५ हजार रुपये
योजना सुरू झाल्यापासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या योजनेतील व्याजदर सध्या वार्षिक ६.६ टक्के दिला जात आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरून खाते उघडणे महत्त्वाचे आहे.
या पोस्ट ऑफिस योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाते उघडल्यानंतर तुम्हाला फायदे मिळू लागतात. यामुळे, तुम्ही जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवल्यानंतर फायदे मिळू लागतात. यामध्ये एक जॉइंट उघडावा लागतो, त्यानंतर फायदा मिळतो. यामध्ये पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरून खाते उघडणे महत्त्वाचे मानले जाते.
Web Title: Post Office Scheme Get Monthly Income From Small Investment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..