Post office scheme | पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पंतप्रधानही करतात गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Post office scheme

Post office scheme : पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पंतप्रधानही करतात गुंतवणूक

मुंबई : तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. पंतप्रधानदेखील पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवन विमा आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात मोठी गुंतवणूक केली आहे.

आकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये त्यांनी NSC मध्ये 8 लाख 43 हजार 124 रुपये गुंतवले आहेत. त्यांनी आयुर्विम्यात 1 लाख 50 हजार 957 रुपयांचा प्रीमियम जमा केला.

हेही वाचा: Post Office Scheme : ३३३ रुपये गुंतवा आणि १६ लाख रुपये मिळवा

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

जर तुम्हाला शून्य जोखमीवर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेचा हा एक भाग आहे.

तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता ?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा किमान लॉक-इन कालावधी 5 वर्षे आहे. अशाप्रकारे पाहिल्यास 5 वर्षानंतरच तुम्ही त्यात गुंतवलेले पैसे काढू शकाल. एनएससीमध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते.

पहिला एकल प्रकार - तुम्ही यामध्ये स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता.

दुसरा जॉइंट ए प्रकार - यामध्ये दोन लोक एकाच वेळी गुंतवणूक करू शकतात.

तिसरा जॉइंट बी प्रकार - यामध्ये दोन लोक गुंतवणूक करतात, परंतु मॅच्युरिटीवर फक्त एका गुंतवणूकदाराला पैसे मिळतात.

हेही वाचा: Post Office Scheme : १५०० रुपये गुंतवा आणि ३५ लाखांचा फायदा मिळवा

किती गुंतवणूक करता येईल

या योजनेत कोणीही किमान रु 1,000 ची गुंतवणूक करू शकतो आणि 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. यामध्ये ६.८ टक्के व्याजदराने व्याज मिळते.

आयकर सवलतही मिळेल

NSC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कलम 80C अंतर्गत दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट दिली जाते.