PMJJBY : 330 रुपयांची बचत करा, 2 लाखांचे लाइफ कव्हर मिळवा

pradhan mantri jyoti bima yojana
pradhan mantri jyoti bima yojanapradhan mantri jyoti bima yojana

देशातील मागास समाजाला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. त्यासाठी सरकारतर्फे कित्येक नवीन योजना सुरू करू शकतात. २०१५मध्ये सुरू झाली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana - PMJJBY) Sk अशी योजना आहे ज्याचा उद्देश मागास वर्गाला सुरक्षा देणे आहे.

या योजनेचा लाभ देशातील १८ ते ५० वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. याचा लाक्ष घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही बँकेमध्ये सेविंग अकाऊंट असणे गरजेचे आहे. या खात्यामध्ये वार्षिक प्रीमियमचे पैसे अॅटो-डेबिट (Auto-Debit) होतात.

आपोआप कट होतो प्रीमियम

या योजनेमध्ये फक्त ३३० रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकता. ही विमा पॉलिसी दर वर्षी रिन्यू करावी लागते. दरवर्षी ३१ मेच्या आधी तुमच्या खात्यामधून आपोआप हे पैसे अॅटो-डेबिट होतात.

pradhan mantri jyoti bima yojana
'ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी' म्हणजे काय? एक कपंनी कमावतेय कोटी रुपये

पॉलिसी वयाच्या ५५ व्या वर्षी बंद होते

PMJJBY अंतर्गत, विमाधारकाला कमाल 2 लाख रुपयांचे जीवन कवच मिळते. योजनेत सहभागी असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित बँका रु. 2 लाख रुपये देतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी प्रीमियमची निश्चित रक्कम आहे, जी रु. 330 इतकी आहे. पॉलिसीधारक 55 वर्षांचे झाल्यावर पॉलिसी आपोआप बंद होते.

pradhan mantri jyoti bima yojana
TB Champions : 5 मुली भारताला करणार टीबीमुक्त, 'अशी' करतायेत जनजागृती

1 जून ते 31 मे एक वर्ष

पॉलिसी 1 जूनपासून सुरू होते आणि 31 मे पर्यंत वैध आहे. पॉलिसीधारकाच्या खात्यातून दरवर्षी देय तारखेला प्रीमियम आपोआप कापला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे पासबुक आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com