'डॅागी'साठी मेडिक्लेम पॅालिसी!

प्रवीण कुलकर्णी
Monday, 31 August 2020

आरोग्य विम्याचे महत्त्व वाढत असताना बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने घरातील एक महत्त्वाचा सदस्य बनत चाललेल्या पाळीव कुत्र्यांसाठी (पेट डॉग) विशेष मेडिक्‍लेम पॉलिसी सादर केली आहे.

आरोग्य विम्याचे महत्त्व वाढत असताना बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने घरातील एक महत्त्वाचा सदस्य बनत चाललेल्या पाळीव कुत्र्यांसाठी (पेट डॉग) विशेष मेडिक्‍लेम पॉलिसी सादर केली आहे. या योजनेनुसार तीन महिन्यांपासून ते सात वर्षे वयाच्या देशी, क्रॉस ब्रीड आणि एक्‍झॉटिक ब्रीडच्या पाळीव कुत्र्यांना आरोग्य विमा संरक्षण देता येणार आहे. विशेष म्हणजे, विम्याचा बेसिक प्रीमियम फक्त ३१५ रुपयांपासून उपलब्ध आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पॉलिसीची वैशिष्ट्ये

रीएम्बर्समेंट / क्‍लेम स्वरूपातील पॉलिसी विविध प्रकारात उपलब्ध.

वार्षिक ३१५ रुपयांपासून ते २५७३ रुपयांपर्यंतचा प्रीमियम

‘ब्रीड’नुसार तीन महिन्यांपासून ते सात वर्षे वयापर्यंतच्या कुत्र्यांसाठी पॉलिसी घेता येणार. जास्तीत जास्त १० वर्षे आयुर्मानापर्यंतच पॉलिसीचा लाभ.  

पॉलिसी घेताना तीन महिन्यांपासून ते चार वर्षे वयापर्यंत कोणत्याही वैद्यकीय चाचणीचे बंधन नाही. चौथ्या वर्षांपासून पुढे वैद्यकीय चाचणी आवश्‍यक.  

अनुक्रमे ७ आणि १५ दिवस प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा लाभ.

इंज्युरी, स्किनचे आजार यापासून ते अगदी कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा विविध आजारांना विमा संरक्षण.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेहमीच्या आरोग्य विमा योजनांप्रमाणेच ‘पेट डॉग’ पॉलिसीत देखील पहिल्या दिवसापासून अपघात संरक्षण, तर काही आजारांसाठी ३० आणि ९० दिवसांचा वेटिंग पिरियड.

बेसिक पॉलिसीअंतर्गत हॉस्पिटलायझेशन आणि ऑपरेशनचा समावेश. अतिरिक्त ‘रायडर’चा पर्याय घेऊन ओपीडी, दीर्घकालीन आजार, मृत्यू, चोरी किंवा भटकंती करताना कुत्रा हरवल्यास मालकाला ‘क्‍लेम’ करता येईल.

शस्त्रक्रियेसाठी वार्षिक कमाल ५० हजार आणि हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी प्रति दिवस २५०० रुपये ते वार्षिक जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंतचा ‘क्‍लेम’ मिळू शकतो.

‘लीगल लायबिलिटी बेनिफिट’अंतर्गत थर्ड पार्टी इंज्युरी म्हणजेच कुत्रा चावल्यास, मालमत्तेचे नुकसान किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मालकाला कायदेशीर कारवाई दरम्यान येणाऱ्या खर्चाचे देखील संरक्षण मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आरएफआयडी’ टॅग असलेल्या कुत्र्याला प्रीमियममध्ये ५ टक्के सूट.    

पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे
बेसिक : हॉस्पिटलायझेशन आणि ऑपरेशन.
रायडर्स : मॉर्टेलिटी बेनिफिट, टर्मिनल डिसीज बेनिफिट, लाँगटर्म केअर कव्हर, ओपीडी कव्हर, थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर, थेफ्ट/लॉस्ट/स्ट्रेईंग कव्हर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin kulkarni writes article about Mediclaim policy for dog