बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

आज शॉर्ट साइड ट्रेडर्सनी न्यूट्रल राहावे असा सल्ला त्यांनी दिला. दुसरीकडे, लाँग साइड प्लेयर्सनी स्टॉप-लॉस 17,440 च्या खाली ठेवावा असेही मजहर म्हणाले.
share market update
share market update esakal

बुधवारी वोलेटाइल सेशननंतर, निफ्टीने महत्त्वपूर्ण 17,500 ची पातळी राखण्यात यश मिळवले. निफ्टी 10 अंकांनी वाढून 17,535 वर बंद झाला. त्याचबरोबर गुंतवणूकदारही अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत असल्याचे दिसून आले.
निर्देशांकाने डेली चार्टवर हँगिंग मॅन पॅटर्न तयार केला. हँगिंग मॅन पॅटर्न हा बेअरिश रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे. हे सहसा अपट्रेंडच्या शेवटी किंवा टॉपवर तयार होतो.

share market update
Share Market Open : RBI च्या पतधोरणामुळे आज शेअर बाजार तेजीत सुरु

आज निफ्टीची वाटचाल कशी होईल?

बाजारात मोठी कमजोरी येण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जोपर्यंत निर्देशांक आदल्या दिवशीचा 17,359 चा नीचांक मोडत नाही तोपर्यंत कोणतीही मोठी कमजोरी अपेक्षित नाही. पण, जूनच्या नीचांकी पातळीपासून 15 टक्क्यांच्या वाढीनंतर बाजार ओवरबॉट झालेला दिसतो.
बुल्स हाय लेव्हल गाठण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चार्टव्यूइंडियाचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मजहर मोहम्मद म्हणाले. दुसरीकडे, बुधवारच्या व्यापार सत्रात हँगिंग मॅन फॉर्मेशन तयार करत असल्याचे दिसले. डेली आणि काही विकली ऑसिलेटरवर जास्त खरेदी केलेले रीडिंग असूनही, प्राइस चार्ट कोणतीही कमजोरी दाखवत नाहीत असा त्यांचा विश्वास आहे.

जर निफ्टी 17,442 च्या वर टिकला तर हा निर्देशांक 17,800 वर जाऊ शकतो. त्यामुळे शॉर्ट साइड ट्रेडर्सनी न्यूट्रल राहावे असा सल्ला त्यांनी दिला. दुसरीकडे, लाँग साइड प्लेयर्सनी स्टॉप-लॉस 17,440 च्या खाली ठेवावा असेही मजहर म्हणाले.

share market update
Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

आज बँक निफ्टी कशी वाटचाल करेल ?

बुधवारी 38,299 वर उघडल्यानंतर बँक निफ्टीही संपूर्ण ट्रेडिंग सत्रात अस्थिर राहिला. निर्देशांकाने इंट्राडे हाय 38,403 आणि 38,155 ची नीचांकी पातळी गाठली. बाजार बंद होताना तो 50 अंकांनी वाढून 38,288 वर बंद झाला. यामुळे डेली चार्टवर एक डोजी पॅटर्न तयार झाला.

बँक निफ्टीला 37,700 वर सपोर्ट असल्याचे हेम सिक्युरिटीजचे पीएमएस प्रमुख मोहित निगम म्हणाले.. निर्देशांक काही काळासाठी 38,750 वर अडकलेला दिसत असल्याचेही ते म्हणाले.

share market update
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
कोल इंडिया (COALINDIA)
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
टाटा स्टील (TATASTEEL)
अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSPITAL)
आयआरसीटीसी (IRCTC)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
लॉरस लॅब (LAURUSLAB)
डिक्सन (DIXON)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

share market update
Share Market: आठवड्याची सुरूवात चांगल्या तेजीने, गुंतवणुकदारांना दिलासा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com