बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

जागतिक संकेतांमुळे मंगळवारी बाजारात चौफेर विक्री झाली. निफ्टी 17000 च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. रियल्टी, मेटल आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली.

ऊर्जा, ऑटो, फार्म शेअर्स दबावाखाली राहिले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. सेन्सेक्स 844 अंकांनी घसरून 57,147 वर बंद झाला. निफ्टी 257 अंकांनी घसरून 16984 वर बंद झाला. निफ्टी बँक 381 अंकांनी घसरून 38712 वर बंद झाला. मिडकॅप 542 अंकांनी घसरून 30568 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स घसरले. निफ्टीचे 50 पैकी 47 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्सची  विक्री झाली.

हेही वाचा: Stock: 34 वरुन थेट 586 रुपयांवर, या शेअरने दिला 1,600% रिटर्न...

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजार दबावाखाली होता आणि सुमारे 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. निफ्टीने सपाट सुरुवात केली पण जसजसा व्यवहाराचा दिवस पुढे सरकत गेला तसतशई त्याची कमजोरीही वाढली आणि निफ्टी 17100च्या सपोर्टच्या खाली घसरला. शेवटी तो 16983.55 च्या पातळीवर बंद झाला.

आयटी पॅकमधील कमजोरीसह, इतर सेक्टर्समध्येही कमजोरी होती, ज्यामुळे बाजारातील सेंटीमेंट कमकुवत झाले. दिग्गज शेअर्ससह लघु-मध्यम शेअर्समध्येही घसरण दिसून आली. मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्स जवळपास 2 टक्क्यांनी घसरले.

इंडेक्सवर नजर टाकली तर आता 16800 ची पातळी निफ्टीसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला तर कमजोरी आणखी वाढेल.

हेही वाचा: Share Market: Sensex 650 अंकानी घसरला, गुतंवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

डिव्हीस लॅब (DIVISLAB)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
नेसले इंडिया (NESTLEIND)
ऑरो फार्मा (AUROPHARMA)
झिंदाल स्टील (ZINADLSTEEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.