
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. कमकुवत ट्रेंडमुळे गुरुवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सेस सलग दुसऱ्या सत्रात दबावाखाली होते. विकली एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्स 337.06 अंकांनी अर्थात 0.57 टक्क्यांनी घसरून 59,119.72 वर बंद झाला. निफ्टी 88.50 अंकांनी अर्थात 0.50 टक्क्यांनी घसरून 17,629.80 वर बंद झाला. (pre analysis of share market update 23 september 2022 )
बीएसईवर एफएमसीजी इंडेक्स 1.3 टक्क्यांनी वाढला. दुसरीकडे ऑटो इंडेक्स 0.7 टक्क्यांनी वधारला. तर बँक, हेल्थकेअर, मेटल, ऑइल अँड गॅस आणि रियल्टी इंडेक्स लाल रंगात बंद झाले.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने डेली आणि इंट्राडे चार्टवर लोअर टॉप फॉर्मेशन केल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या श्रीकांत चौहान यांनी म्हटले. यानंतर ते 20-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेजखाली बंद झाले. यावरून त्यात आणखी कमजोरी दिसून येत आहे. निफ्टीला हायर लेव्हलवर रझिस्टंस दिसून येत आहे, तर तो खाली 17500 वर सपोर्ट घेत असल्याचे ते म्हणाले.
17500 आणि 17770 ची पातळी निफ्टीमधील महत्त्वाची सपोर्ट लेव्हल असेल, ज्यावर लक्ष ठेवले पाहिजे असे श्रीकांत चौहान म्हणाले. दुसरीकडे, जर तो 17500 च्या खाली गेला तर निफ्टी 17,400-17,350 च्या पातळीवर घसरू शकतो. पण 17,700 ची पातळी तोडल्यास तो 17,800-17,850 पर्यंत जाऊ शकतो.
निफ्टीमध्ये मजबूत चढ-उतार दिसल्याचे शेअरखानचे बीएनपी परिबाचे गौरव रत्नपारखी म्हणाले. त्याने दोनदा वरच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला पण 20 DMA जवळ अडकल्याचे दिसून आले. आज यात 17,700-17,720 रझिस्टंस लेव्हल झोन असेल असेही ते म्हणाले.
कंसोलिडेशनच्या टप्प्यात बुल्स आणि बियर्स यांच्यात स्पर्धा होऊ शकते. यामध्ये निफ्टी खाली जाण्याची दाट शक्यता आहे. जर इंडेक्स घसरला तर त्यात 17,430 ची पातळी दिसू शकते असे ते म्हणाले. पण, याच्या खाली ते शॉर्ट टर्ममध्ये 17,200 च्या पातळीपर्यंत खाली सरकू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
टायटन (TITAN)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)
मारुती (MARUTI)
एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)
पेज इंडिया (PAGEINDIA)
भारतफोर्ज (BHARATFORGE)
ट्रेंट (TRENT)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
हिंदुस्थान एअरोनॉटीकल लिमिटेड (HAL)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.