Stock Market : 'हा' बँकिंग स्टॉक येत्या दिवसांत करेल आणखी कमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock Market

Stock Market : 'हा' बँकिंग स्टॉक येत्या दिवसांत करेल आणखी कमाल

Stock Market : गेल्या काही दिवस बँकिंग शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून येते आहे. त्यामुळे एसबीआय, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. यापैकी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स मल्टीबॅगर ठरलेत. 23 वर्षांत त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 14 पटीने वाढ केली आहे.

हेही वाचा: Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म

1 जानेवारी 1999 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 10.09 रुपयांवर होते, जे आता बीएसईवर 141.20 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, त्याची वाढ थांबलेली नाही. त्याचे शेअर्स आणखी 43 टक्क्यांनी अधिक वाढू शकतात असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या यात गुंतवणुकीसाठी 202 रुपयांचे टारगेट निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा: Stock market: 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरीट...

बँक ऑफ बडोदाची ऍसेट क्वालिटी सुधारत आहे आणि स्टँडर्ड रिस्ट्रक्टरिंग मॅनेज करण्याच्या लेव्हलवर असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. याशिवाय क्रेडिट ग्रोथ चांगली आहे, जी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Stock Market : या डिफेन्स स्टॉकचा मजबूत परतावा, आणखी तेजी येणार ?

कमी क्रेडिट कॉस्ट आणि सातत्याने चांगले मार्जिन यामुळे चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बँक ऑफ बडोदाचा नफा वाढू शकतो आणि अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो असे एलकेपी रिसर्चने म्हटले आहे. बँक ऑफ बडोदाचे (BOB) शेअर्स सध्या खूप स्वस्त असल्याचे एलकेपीचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी गुंतवणुकीचे टारगेट 146 रुपयांवरून 202 रुपये केले आहे.

हेही वाचा: Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

43 टक्के परतावा

बँक ऑफ बडोदाचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 68 टक्क्यांहून अधिक आणि एका वर्षात 77 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्याच्या किमती 52 आठवड्यांच्या विक्रमी पातळीच्या जवळ आहेत, त्यांनी 19 सप्टेंबरला143.40 रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता. सध्याच्या किमतीच्या अनुषंगाने विचार केल्यास 202 रुपयांच्या टारगेटनुसार तुम्हाला 43 टक्के परतावा मिळू शकतो.

हेही वाचा: Stock Market : सेन्सेक्स ५५,८१६ तर निफ्टी १६,६४२ वर बंद; दोन दिवसांनी वाढ

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Stock Market Banking Shares Multi Bagger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketStock