बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टी शॉर्ट टर्म करेक्शन मोडमध्ये असल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले.
Share Market Update
Share Market Updateesakal

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सलग चौथ्या सत्रात बाजारात विक्री दिसून आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराने नवीन आठवड्याची सुरुवात नकारात्मक केली आणि घसरण वाढत गेली. मात्र, इंट्राडे रिकव्हरी होऊनही बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी  (IT) वगळता सर्वच क्षेत्रांत विक्री दिसली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 953.70 अंकांनी अर्थात 1.64% घसरून 57,145.22 वर बंद झाला. निफ्टी 311 अंकांनी अर्थात 1.79% घसरून 17,016.30 वर बंद झाला.

Share Market Update
Share Market : इंडस्ट्रियल सेक्टरचा 'हा' शेअर मल्टीबॅगर, अजूनही वाढ अपेक्षित

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी इंडेक्स 17,016 च्या पातळीवर बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. सोमवारी विक्रीचा मोठा दबाव दिसला. आयटी वगळता सर्व सेक्टरल इंडेक्स लाल रंगात बंद झाले. ब्रॉडर इंडेक्सही कमजोरीसह व्यवहार करत होता. त्यातील प्रत्येक इंडेक्स 3% पेक्षा जास्त घसरला.

जागतिक आघाडीवर कोणताही दिलासा नसल्याचे अजित मिश्रा म्हणाले. याशिवाय, परकीय गुंतवणूकदारांनी पुन्हा विक्री सुरू केल्याने बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. निफ्टीमध्ये 16,800-16,900 चा झोन दिसू शकतो. एफएमसीजी, फार्मा आणि आयटीमधील निवडक पॉकेट्स कमी परतावा दाखवत आहेत. तर बरेच सेक्टर्स दबावाखाली व्यवहार करताना दिसून आले.

Share Market Update
Stock: या हॉटेल स्टॉकचा 6 महिन्यात 141% रिटर्न

गेल्या काही आठवड्यांपासून निफ्टी शॉर्ट टर्म करेक्शन मोडमध्ये असल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले. सोमवारी जागतिक संकेतांमुळे त्याचे ओपनिंग गॅप कमी झाले. निफ्टी 17166 च्या ऑगस्टच्या नीचांकी खाली घसरला. विक्रीच्या दबावामुळे तो 200 DMA च्या जवळ पोहोचला.

इंडेक्सला 16947-17018 या गॅप एरियातून सपोर्ट मिळाला असल्याचे गौरव म्हणाले. जुलैमध्ये डेली चार्टवर गॅप एरिया तयार झाला होता. इंडेक्सने त्या पातळीपासून इंट्राडेवर जाण्याचा प्रयत्न केला, पण कायमस्वरूपी रिकव्हर होऊ शकला नाही. हा अपट्रेंड येत्या काळात 17200 च्या पातळीवर अडकलेला दिसून येईल. दुसरीकडे, जर निफ्टीने गॅप एरिया तोडला तर तो 16800 पर्यंत घसरू शकतो.

Share Market Update
Sensex अन् Nifty मध्ये घसरण, शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
हिन्दाल्को (HINDALCO)
मारुती (MARUTI)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
ए यू बँक (AUBANK)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पेज इंडिया (PAGEINDIA)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com