
Share Market : इंडस्ट्रियल सेक्टरचा 'हा' शेअर मल्टीबॅगर, अजूनही वाढ अपेक्षित
गेल्या काही काळात अनेक स्टॉक्स मल्टीबॅगर म्हणून समोर आलेत. अशातच सनडिसन इन्फ्रास्ट्रक्चर (Sunedison Infrastructure) हा असाच एक स्टॉक आहे ज्याने गेल्या 5 वर्षात आपल्या शेअरहोल्डर्सना चांगली कमाई करुन दिली आहे. कंपनीची मार्केट व्हॅल्यू 223.87 कोटी रुपये आहे. सनडिसन इन्फ्रास्ट्रक्चर हे सोलर एनर्जी सर्व्हिसेसमधील एक प्रसिद्ध नाव आहे. कंपनीला सोलर सिस्टीम डिझाईनिंग, इम्प्लीमेंटेशन, इन्स्टॉलेशनचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
सनडिसन इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 498.60 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 4.99 टक्क्यांनी वधारत बंद झाला होता. गेल्या 5 वर्षात या स्टॉकमध्ये जोरदार वाढ होताना दिसत आहे. 20 मार्च 2019 रोजी शेअर 5.82 रुपयांवर होता आणि त्यानंतर या स्टॉकने मागे फिरुन पाहिले नाही.
या स्टॉकमध्ये 8,467.01 टक्के वाढ झाली आहे, तर वार्षिक आधारावर यात 150.99 टक्के वाढ दिसली आहे. अशा स्थितीत जर कोणी 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 85.67 लाख रुपये झाले असते.
गेल्या 1 वर्षातील या स्टॉकची किंमत पाहिली तर 24 सप्टेंबर 2021 रोजी या स्टॉकची किंमत 52.24 रुपये होती. सध्याच्या किमतीच्या तुलनेत या शेअरने 1 वर्षात 850.62 टक्के परतावा दिला आहे. अशा स्थितीत जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 9.50 लाख झाले असते.
या वर्षाचा विचार केल्यास 3 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक 184.20 वर होता. सध्याच्या किमतीशी तुलना केल्यास आता या शेअरने 170.68 टक्के परतावा दिला आहे. तर 2022 मध्ये सेन्सेक्स आतापर्यंत 1.83 टक्क्यांनी घसरला आहे. अशा स्थितीत, या वर्षाच्या सुरुवातीला जर एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 2.70 लाख रुपये झाले असते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा