केफिन टेक्नोलॉजीज आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

केफिन टेक्नोलॉजीज आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत ?

मुंबई : फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म आणि देशातील सर्वात मोठे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट (RTA) केफिन टेक्नोलॉजीज (Keffin Technologies) आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीला 2400 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडून मंजुरी मिळाल्याचे समजते आहे. पीटीआयला सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे.

केफिन टेक्नॉलॉजीजने या वर्षी 31 मार्चला सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने कंपनीला आयपीओसाठी जाण्यास मान्यता दिल्याचे सूत्रांनी समजते आहे. त्याचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जाऊ शकतात.

आयपीओ पुर्णपणे ऑफर फॉर सेल असलयाचे कळते आहे. कंपनीचे प्रमोटर जनरल अटलांटिक सिंगापूर फंड प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओद्वारे कंपनीचे शेअर्स विकणार आहेत. ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार जनरल अटलांटिकचा केफिनमध्ये 74.94 टक्के हिस्सा आहे. गेल्या वर्षी कोटक महिंद्रानेही यामध्ये 9.98 रुपयांचे स्टेक घेतले होते.

इश्यू ऑफर फॉर सेल असल्याने कंपनीला शेअर्सच्या विक्रीतून कोणतेही पैसे मिळणार नाहीत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

केफिन टेक्नोलॉजीज ऍसेट मॅनेजर्स आणि कॉर्पोरेट इश्यूअर्सना सर्व्हिसेज देते. याशिवाय, ते मलेशिया, फिलीपिन्स आणि हाँगकाँगमध्ये खासगी रिटायरमेंट योजना आणि म्युच्युअल फंडांना सुरु करणे आणि या संबंधिक प्रक्रियेची सर्व्हिसही देते. भारतीय म्युच्युअल फंडांना सेवा देणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे.

ही कंपनी देशातील 42 पैकी 25 ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांना (AMCs) सेवा देते, म्हणजेच तिचा बाजारातील हिस्सा 60 टक्के आहे. एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये, कंपनीने 458 कोटी रुपयांचा ऑपरेशनल रेव्हेन्यू आणि 97.6 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला. कंपनीच्या महसुलात वर्षभरात 35 टक्के वाढ झाली आणि नेट प्रॉफिट 313 टक्क्यांनी वाढला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :IPO