CNG Price : सीएनजी, पाईप लाईन गॅसच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG-PNG Price Increases cng price hike of rs 4 and png price-of-rs 3 mumbai mahanagar gas limited mgl
CNG Price : सीएनजी, पाईप लाईन गॅसच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

CNG Price : सीएनजी, पाईप लाईन गॅसच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

मुंबई : पेट्रोल-डिझेरच्या दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलेलं असताना आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (घरगुती पाईपलान गॅस) आज मध्यरात्रीपासून मोठी वाढ झाली आहे. त्यानुसार, आता सीएनजीचा दर ८० रुपये प्रतिकिलो तर पीएनजीचा दर ४८.५० रुपये इतका झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडनं (MNGL) ही माहिती दिली. (price hike in CNG and pipeline natural gas need to know new rates)

हेही वाचा: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजेपक्षेंनी अखेर देश सोडला; मालदीवमध्ये दाखल

आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या दरात वाढ झाली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचण येत असल्यानं पाईप गॅस बरोबरच सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडनं घेतला आहे. या दरावाढीनुसार, सीएनजीच्या दरात चार रुपयांनी तर पीएनजीच्या दरात प्रतिघनमीटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं सीएनजीचा आजचा दर हा ८० रुपये प्रतिकिलो तर पीएनजीचा दर हा ४८.५० रुपये इतका झाला आहे.

हेही वाचा: Gold-silver Price: गुरुपौर्णिमेला सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सीएनजीमुळं पेट्रोलच्या वापरात ५१ टक्के तर डिझेलच्या वापरात १८ टक्के बचत होत असल्याचं महानगर गॅसनं म्हटलं आहे. तसेच पीएनजीचा दर हा एलपीज्या दरापेक्षा कमी असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.

Web Title: Price Hike In Cng And Pipeline Natural Gas Need To Know New Rates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fuel PriceArthavishwa
go to top