esakal | सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; नवे दर...
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; नवे दर...

- कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सोने नव्या उच्चांकीवर

- सोने प्रति 10 ग्रॅम 1,155 रुपयांनी वधारले, चांदी 1,198 रुपयांनी महागली

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; नवे दर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सोन्याचे भाव मोठी उसळी घेत फेब्रुवारी 2013 नंतरची सर्वाधिक पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावांमध्ये मोठी वाढ होत ते प्रति 10 ग्रॅममागे 1,155 रुपयांनी वधारले आहे. सध्या सोने 44,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोचले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सातत्याने होत असलेली घसरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूच्या फैलावाचा विपरित परिणाम झाल्यामुळे जगभरात गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. तर चांदीच्या भावातही चांगलीच वाढ झाली असून, चांदीचे भाव 1,198 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. चांदी 46,531 रुपये प्रति किलोवरून 47,729 रुपये प्रति किलोवर पोचली आहे.

'कोरोना'वर हाच एकमेव उपाय

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,638 डॉलर प्रति औंस इतकी आहे. तर चांदीचा भाव 17.17 डॉलर प्रति औंस इतके आहेत. सोने हा गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय समजला जातो.

जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठी पडझड झाली आहे. त्यातच, चीनची प्रत्यक्ष संबंध न दिसता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हे चिंतेचे कारण ठरते आहे. कोरोना विषाणूचा परिणाम जर असाच सुरू राहिला तर लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,700 डॉलर प्रति औंसची पातळी गाठेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.