अर्थव्यवस्थेला 'चौपट' करून सरकार गप्प: प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 10 September 2019

 काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला मंदीवरून घेरले आहे

नवी दिल्ली: देशभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्राला सर्वाधिक मंदीने ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत सरकाराच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?”, असे ट्विट करत प्रियांका गांधी यांनी सरकारच्या कार्यावर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परिणामी वाहन कंपन्यांकडून लोकांना कामावरून कमी केले जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील अर्थव्यवस्था घसरत चालली असल्याची टीका केली होती. “सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने लागू केलेली नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली असल्याचेही त्यांनी सांगितले. आता अर्थव्यवस्थेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा”, असेही सिंग यांनी सांगितले. 

 प्रियांका गांधी ट्विट करत म्हणाले आहे की, “अर्थव्यवस्था मंदीच्या खोल दरीत जाऊ लागली आहे. लाखो भारतीय बेरोजगार होत आहेत. ऑटो सेक्टर आणि ट्रक सेक्टरमधील उत्पादन-ट्रान्सपोर्टेशनमध्ये घट झाली आहे. ही नकारात्मक वाढ बाजारपेठेचा विश्वास तुटत असल्याचेच संकेत आहेत. सरकार डोळे कधी उघडणार”. शिवाय त्या म्हणाल्या अर्थव्यवस्थेची वाट लावून सरकार गप्प बसले आहे. कंपन्या मंदीच्या तडाख्यात सापडल्या असून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi hits out at Centre over decline in GDP on Twitter asks when will the government open its eyes?