esakal | भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुली
sakal

बोलून बातमी शोधा

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुली

कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला.

भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ६१.४५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ६०४.५० अंशांवर बंद झाला. 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरलला ७० डॉलरवर गेला आहे. त्यामुळे तेल वितरक कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव वाढला होता. आजच्या सत्रात वित्तीय सेवा, धातू, ऊर्जा आदी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून  आला. 

आयटी आणि टेक शेअर्स तेजीत होते. येस बॅंक, वेदांता, टाटा मोटर्स, रिलायन्स, एसबीआय आदी शेअरमध्ये दोन टक्‍क्‍यांहून अधिक घसरले. मात्र इन्फोसिस, ओएनजीसी, टीसीएस, पॉवरग्रीड, एनटीपीसी हे शेअर तेजीसह बंद झाले.

loading image