Property Buying Tips : प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी!

घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढ्यांची एक स्थावर मालमत्ता असते.
Property Buying Tips : प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी!
Summary

घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढ्यांची एक स्थावर मालमत्ता असते.

स्वत:चे हक्काचे घर असणे हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. कारण ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढय़ांची एक स्थावर मालमत्ता असते. घर खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

घर खरेदी विक्रीमध्ये कोणते कायदे येतात. कोणते कागदपत्रे लागतात, याबद्दलची अधिक माहिती नसल्याने अनेक लोक प्रॉपर्टी खरेदी करायला घाबरतात. यासाठीच आज जाणून घेऊयात प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी.

संबंधित विक्रेत्याची ओळख

प्रॉपर्टी खरेदी करताना विक्रेत्याची चांगली ओळख करून घ्यायला विसरू नका. तुम्ही ज्या व्यक्तीकडून प्रॉपर्टी घेणार आहात त्या व्यक्तीकडे प्रॉपर्टी विकण्याचे अधिकार आहेत का, हे तपासा. विक्रेता ही प्रॉपर्टी कंपनी फर्म किंवा भागीदारी फर्म म्हणून विकत आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. विक्रेता आपल्याला फसवत तर नाही, हे पाहण्यासाठी त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड चेक करा.

Property Buying Tips : प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी!
Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

प्रॉपर्टीचा हक्क आणि कायदा

कायद्यानुसार काही राज्यात शेत जमीन विकायची असल्यास खरेदी करणारा शेतकरी असेल तरच ती विकता येते. शेड, शेत घर, बांध, शेततळे, पाईपलाईन, झाडे यांच्या वरती शेत जमीन मालकाचे अधिकार, उदाहरणार्थ विहीरीतील हिस्सा आहे का हे तपासून घ्यावे. प्रॉपर्टी संदर्भात कायदेशीर बाबी नीट तपासून घ्या.

कृपया रेरा (RERA) नोंदणी तपासा

कोणतीही मालमत्ता घेताना, ती रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी) च्या नियमांनुसार नोंदणीकृत असावी, हे लक्षात ठेवले पाहीजे. ५०० चौ.मी.पेक्षा कमी जागेत बांधलेल्या फ्लॅट्स किंवा घरांना रेरा नियम लागू होत नाही.

Property Buying Tips : प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी!
Technology : इतरांच्या आधी मोबाईलवर नवीन गेम खेळण्यासाठी प्ले स्टोअरवर सेटिंग कशी कराल?

प्रत्येक राज्याच्या रेरा नियमांमध्ये फरक असू शकतो. प्रत्येक राज्याची RERA ची स्वतःची वेबसाइट आहे. संबंधित राज्याच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही खरेदी करत असलेल्या मालमत्तेचा RERA क्रमांक टाकून माहिती मिळवू शकता.

विक्रीपत्र (Sale Deed) देखील महत्त्वाचे

जेव्हा जमीन कुटूंबातील एखाद्याला वारसाहक्काने दिली जाते. तेव्हा संबंधित व्यक्तीकडे विक्रीपत्र आणि रजिस्ट्रर कागदपत्रे नसतात. मात्र त्यांच्याकडे जमाबंदीची कागदपत्रे आहेत का हे तपासा. सरकार दर 5-6 वर्षांनी जमीनींचे सर्वेक्षण करते. त्यावेळी जमीन खऱ्या मालकाच्या नावावर नोंदवली जाते.

हेही लक्षात ठेवा

  • स्थावर प्रॉपर्टीमध्ये कोणता दोष नाही, हे तपासा.

  • तुम्ही ज्या व्यक्तीकडून प्रॉपर्टी खरेदी करणार तो खरा आहे की बनावट हे तपासा.

  • तुम्ही खरादी करत असलेल्या प्रॉपर्टीवर केस सुरू नाही याची खात्री करा.

  • प्रॉपर्टीवर कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आहे का हे तपासा.

  • प्रॉपर्टीच्या सरकार दरबारी असलेल्या नोंदी तपासा.

Property Buying Tips : प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यावी!
Video Viral : स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षीय वृद्धाने काढली चक्क वरात, काय आहे कारण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com