खुशखबर! देशातील बँका आता एकाचवेळी उघडणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई: बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  केंद्रीय अर्थ मंत्रालयातील बँक विभागाने बँकांच्या कामकाजाच्या वेळेसंदर्भात निर्णय घेतला आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजाची एक वेळ निश्चित करण्यात येणार आहे. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहे. 
 
अर्थ मंत्रालयाने देशातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ एक असावी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जून महिन्यात बैठक घेतली होती. बऱ्याचदा प्रत्येक बँकांच्या कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या असतात त्यामुळे ग्राहकांना मात्र त्रास होतो. मात्र बैठकीत चर्चा झाल्यानंतर कामकाजाची वेळ बदलण्यास मंजूरी देण्यात आली. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसंदर्भात इंडियन बँक असोसिएशनने एका उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बँकांच्या शाखांच्या कामकाजाचे वेळ कशी असावी यासाठी 3 पर्याय सुचवले होते. 

पहिला पर्याय सकाळी 9 ते दुपारी 3 
दुसरा पर्याय सकाळी 10 ते दुपारी 4 
तिसरा पर्याय सकाळी 11 ते संध्याकाळी 5 

सर्व बँकांना 31 ऑगस्टपर्यंत सर्व जिल्हा स्तरीय ग्राहक समितीची बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. शिवाय त्याची माहिती वृत्तपत्रातून देखील देण्याचे इंडियन बँक असोसिएशनने सर्व बँकांना सांगितले आहे. त्यामुळे आता बँकांच्या कामकाजाची नवी वेळ सप्टेंबर पासून लागू होणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public sector banks to soon adopt standard operating hours pan India