'पीएनबी'ने कमी केले मुदत ठेवींवरील व्याजदर

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बॅंकेतील खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. परिणामी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या. या पार्श्वभूमीवरच आता बँकांनी त्याला प्रतिसाद देत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यास सुरूवात केली आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) 0.25 टक्क्याची कपात केली आहे.

नवी दिल्ली: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटीहून अधिक निधी जमा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बॅंकेतील खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. परिणामी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या. या पार्श्वभूमीवरच आता बँकांनी त्याला प्रतिसाद देत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यास सुरूवात केली आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) 0.25 टक्क्याची कपात केली आहे.

गेल्या आठवड्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 0.15 टक्के दरकपात केली होती. पीएनबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.10 ते 0.25 टक्क्याची कपात केली आहे.  बॅंकेकडे रु.47 हजार कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. याशिवाय, बँकेने मोठ्या ठेवींवरील व्याजदरात 0.10 ते अर्ध्या टक्क्याची कपा त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याजदर 23 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

एसबीआयने एक वर्ष ते 455 दिवसांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.90 टक्के करण्यात आला आहे. याआधी तो 7.05 टक्के होता. त्याचप्रमाणे 456 दिवस ते दोनवर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 7.10 टक्क्यांवरून कमी करून तो आता 6.95 टक्के केला आहे. तसेच दोन वर्ष ते तीन वर्षादरम्यानच्या मुदत ठेवीवर 6.85 टक्के दराने व्याज मिळेल.

आता आणखी देखील काही बँकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 7 डिसेंबरला आरबीआय पतधोरण आढावा घेणार आहे. त्यामध्ये रेपोदरात कपात करण्याची शक्यता असल्याने कर्जाचे दर देखील कमी होण्याची आशा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab National Bank Cuts Deposit Rates