esakal | पंजाब नॅशनल बँकेची सोनेतारण कर्ज व्याजात कपात | PNB bank
sakal

बोलून बातमी शोधा

pnb-jobs.jpg

पंजाब नॅशनल बँकेची सोनेतारण कर्ज व्याजात कपात

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेने (punjab national bank) सणासुदीच्या दिवसात आपल्या कर्जांच्या व्याजदरात (loan interest) कपात केली असून सोनेतारण कर्जाच्या (Gold loan) व्याजदरातही मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता बँकेचे सोनेतारण कर्ज 7.30 टक्के दराने तर सोनेरोखे कर्ज 7.20 टक्के दराने मिळेल.

हेही वाचा: शिवसेना सत्तेत असताना मराठी भाषेची पीछेहाट

याशिवाय पीएनबीने गृह कर्जाचे व्याजदर 6.60 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. तर वाहनकर्ज 7.15 टक्के आणि वैयक्तिक कर्ज 8.95 टक्क्यांपर्यंत मिळेल. बँकेने गृहकर्जावर आकारल्या जाणाऱ्या मार्जिन मनी मध्येही कपात केली आहे. आता गृहकर्ज घेणारे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 80 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकतात. या कर्जांवरील प्रोसेसिंग शुल्कही माफ करण्यात आले आहे.

loading image
go to top