शिवसेना सत्तेत असताना मराठी भाषेची पीछेहाट

पालिकेच्या शाळांवरून आमदार अमित साटम यांची टीका
MLA-Amit-Satam
MLA-Amit-Satamsakal media

गोरेगाव : शिवसेनेने मराठी भाषा (Marathi language) आणि अस्मितेचा आधार घेत मागील तीस वर्षे मुंबई महापालिकेत (bmc) सत्ता आपल्या ताब्यात ठेवली; मात्र मागील काही वर्षांमध्ये शिवसेना (shivsena) पालिकेत किंवा राज्यात सत्तेवर असूनही मराठी भाषेची शाळांमधून व विशेषतः पालिकेच्या शाळांमधून (bmc schools) पीछेहाट झाली, अशी टीका अंधेरीचे भाजप आमदार अमित साटम (Amit satam) यांनी केली.

MLA-Amit-Satam
महिलेच्या अश्लील व्हिडीओंद्वारे पनवेलमध्ये १० लाखांची खंडणी

प्रभाग क्रमांक ७१ चे नगरसेवक अनिल मकवानी, अमित साटम यांनी माहितीच्या अधिकारात मुंबई महापालिका शाळेमधील मराठी मुलांच्या संख्येची माहिती मागितली होती. ती आकडेवारी सादर करून त्यांनी शिवसेनेवर टीका केली. सन २०१०-११ मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ इतकी, तर त्यातील मराठी विद्यार्थीसंख्या १,०२,२१४ होती. सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० इतकी राहिली आहे, तर त्यातील मराठी मुलांची संख्या ३३,११४ इतकी आहे.

शाळांची अवस्था वाईट झाली असून त्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. अपवादात्मक शाळा बऱ्या आहेत, संगणकीकरण झाल्याचे, पालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा अधिक ओढा आहे, हे दाखविण्यात येते; मात्र प्रत्यक्षात मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्याध्यापक मिळत नसल्याची टीका साटम यांनी केली आहे. हे असेच राहिले, तर मराठी मुलांसाठी हक्काची शाळाच शिल्लक राहणार नाही, असेही साटम म्हणाले.

वर्ष- मराठी शाळांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या

२०१०-२०११ ४१३ १,०२,२१४

२०११-२०१२ ३९६ ९२,३३५

२०१२-२०१३ ३८५ ८१,२१६

२०१३-२०१४ ३७५ ६९,३३०

२०१५-२०१६ ३५० ५८,६३७

२०१६-२०१७ ३२८ ४७,९४०

२०१७ -२०१८ ३१४ ४२,५३५

२०१८-२०१९ २८७ ३६,५१७

२०१९-२०२० २८३ ३५,१८१

२०२०-२०२१ २८० ३३,११४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com